Medical check up for Covid-19 on 22/5/2020
दि. १०-०५-२०२० रोजी श्री.भरणै सरांच्या आवाहनाला तत्परतेने प्रतिसाद देत डॉ बाबासाहेब आंबेडकर हेल्थ ऑर्गनायझेशन (BAHO) ची टीम गणेशपेठ बस स्थानकावर आपापल्या गावी जाण्यासाठी जमा झालेल्या प्रवाशांची करोना संबंधी वैद्यकीय तपासणी करण्यासाठी दु.३.३० वा. पोहोचली. गच्च भरलेल्या बसस्थानकावर पोलीस आणि म.रा.परिवहन यांच्या सहकार्याने तपासणीची जागा सिद्ध केली. एकंदरीत २२२ व्यक्तिंची वैद्यकीय तपासणी करून त्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यात आले. डाॅ कृष्णा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. मुकेश वाघमारे, डॉ विजय मोहबिया, डॉ निकेतन यांनी अत्यंत तन्मयतेने जवळपास रात्री ९.३०पर्यंत तपासणी करून बस स्थानकावर हजर असलेल्या प्रत्येक व्यक्तीला वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यात आले. स्थानकावर छोट्या बाळापासून ते वयस्कर व्यक्ती होत्या.प्रवासी छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेश, बिहार…