Medical check up for Covid-19 on 22/5/2020

दि. १०-०५-२०२० रोजी श्री.भरणै सरांच्या आवाहनाला तत्परतेने प्रतिसाद देत डॉ बाबासाहेब आंबेडकर हेल्थ ऑर्गनायझेशन (BAHO) ची टीम गणेशपेठ बस स्थानकावर आपापल्या गावी जाण्यासाठी जमा झालेल्या ‌प्रवाशांची करोना संबंधी वैद्यकीय तपासणी करण्यासाठी दु.३.३० वा. पोहोचली. गच्च भरलेल्या बसस्थानकावर पोलीस आणि म.रा.परिवहन यांच्या सहकार्याने तपासणीची जागा सिद्ध केली. एकंदरीत २२२ व्यक्तिंची वैद्यकीय तपासणी करून त्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यात आले. डाॅ कृष्णा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. मुकेश वाघमारे, डॉ विजय मोहबिया, डॉ निकेतन यांनी अत्यंत तन्मयतेने जवळपास रात्री ९.३०पर्यंत तपासणी करून बस स्थानकावर हजर असलेल्या प्रत्येक व्यक्तीला वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यात आले. स्थानकावर छोट्या बाळापासून ते वयस्कर व्यक्ती होत्या.प्रवासी छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेश, बिहार…

Read More

Medical Checkup for Covid 19 on 21-5-2020

नेहमी प्रमाणे आजही डॉ बाबासाहेब आंबेडकर हेल्थ ऑर्गनायझेशन (BAHO) व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त नागरी जयंती समितीची टीम भर उन्हात नागपूरातील सर्वात जास्त रहदारी असलेल्या पांझरी नाक्यावर दुपारी २.३० ला पोहोचली. पांझरी टोल नाक्यावर ट्रक थांबताच प्रवासी खाली उतरत होते.आज प्रवाशांची संख्या कमी होती.त्यांना स्नेहाने कार्यकर्ते व पोलीस कर्मचारी जेवणं करण्यास सांगत होते. केंद्रावर सर्व व्यवस्था सुसंघटित होती. डॉ.कृष्णा कांबळे सरांच्या मार्गदर्शनाखाली आपापल्या गावी जाण्यासाठी जमलेल्या सर्व प्रवाशांची करोना संबंधी वैद्यकीय तपासणी आज टीम लीडर डॉ.रोशन सिंहमारे यांनी केली.त्यांनी माणुसकी ला जिवंत ठेवित अत्यंत त्रासदायक परिस्थितीतून जाणाऱ्या प्रवाशांची तत्परतेने वैद्यकीय तपासणी करून त्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र दिले. तर अनिकेत माटे यांनी…

Read More

Medical check up for Covid 19 on 19/5/2020

८ वा दिवस. १९-०५-२०२० आज पण डॉ बाबासाहेब आंबेडकर हेल्थ ऑर्गनायझेशन (BAHO) व डॉ.  बाबासाहेब आंबेडकर संयुक्त नागरी जयंती समितीची टीम  नागपूरातील सर्वात जास्त रहदारी असलेल्या पानझरी नाक्यावर भर दुपारी उन्हात  पोहोचली. आज ची पण टोल नाक्यावरील प्रवाशांची व्यवस्था चांगली होती.बॅरीकेड्स असल्यामुळे प्रवासी शिस्तबद्ध पद्धतीने रांगेमध्ये उभे राहून वैद्यकीय तपासणी करून घेत होते.  डॉ.कृष्णा कांबळे सरांच्या मार्गदर्शनाखाली आजचे टीम लीडर डॉ. देवनाथ खंडारे , सर्जरी विभाग यांनी आपापल्या गावी जाण्यासाठी जमलेल्या सर्व प्रवाशांची करोना संबंधी वैद्यकीय तपासणी  करून त्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र दिले. आज‌ जवळपास  ३०० लोकांची वैद्यकीय तपासणी यशस्वीपणे पार पाडण्यामध्ये  निखिलेश ‌बेले , अनिकेत माटे यांनी नाक्यावर प्रवाशांची नोंदणी…

Read More

Medical check up for Covid-19 by BAHO & DBASNJS on 15/5/2020

आज २ ठिकाणी BAHO व DBASNJS कालच्या प्रमाणे आजही डॉ बाबासाहेब आंबेडकर हेल्थ ऑर्गनायझेशन (BAHO) व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त नागरी जयंती समितीची टीम भर उन्हात नागपूरातील सर्वात जास्त रहदारी असलेल्या पांझरी नाक्यावर दुपारी २.३० ला पोहोचली. तर दुसरी टीम भाटिया फार्म कामठी रोड येथे पोहोचली ट्रक भरून भरुन प्रवासी पांझरी टोल नाक्यावर उतरत होते परंतु आज वैद्यकीय प्रमाणपत्राच्या प्रती उपलब्ध नसल्यामुळे वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यास विलंब झाला. प्रमाणपत्र येताच डॉ.कृष्णा कांबळे सरांच्या मार्गदर्शनाखाली आपापल्या गावी जाण्यासाठी जमलेल्या सर्व प्रवाशांची करोना संबंधी वैद्यकीय तपासणी डॉ.माया ब्राह्मणे , डॉ.प्रसाद माया ब्राह्मणे‌ व डॉ. निकेतन यांनी द्रुतगतीने करून त्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र दिले.तर राज…

Read More

Medical check up for Covid 19 on 14/5/2020 at Oriental NBP tall near Pinjari Farm

श्री.निलेश‌ भरणे सरांच्या आणि च्या आवाहनाला पुनःश्च प्रतिसाद देत डॉ बाबासाहेब आंबेडकर हेल्थ ऑर्गनायझेशन (BAHO) व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त नागरी जयंती समितीची टीम भर उन्हात नागपूरातील सर्वात जास्त रहदारी असलेल्या पांझरी नाक्यावर दुपारी २.३० ला पोहोचली. ट्रक भरून भरुन प्रवासी पांझरी टोल नाक्यावर उतरत होते.इथे त्यांची वैद्यकीय तपासणी होत होती. डॉ.कृष्णा कांबळे सरांच्या मार्गदर्शनाखाली व डॉ.राज गजभिये. प्रा.व विभाग प्रमुख सर्जरी विभाग यांच्या प्रोत्साहनाने सर्व डॉ. आपापल्या गावी जाण्यासाठी जमा झालेल्या ‌प्रवाशांची करोना संबंधी वैद्यकीय तपासणी करण्यासाठी सज्ज झाले. डॉ.माया ब्राह्मणे , डॉ.प्रसाद माया ब्राह्मणे‌ व डॉ. निकेतन यांनी तत्परतेने प्रवाशांची तपासणी करून त्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यात आले.तर राज…

Read More

Medical check up for Covid 19 on 11/5/2020

दि. ११-०५-२०२० रोजी श्री.निलेश भरणे सरांनी सांगितल्याप्रमाणे डॉ बाबासाहेब आंबेडकर हेल्थ ऑर्गनायझेशन (BAHO) ची टीम दुसऱ्या दिवशीही गणेशपेठ बस स्थानकावर आपापल्या गावी जाण्यासाठी जमा झालेल्या ‌प्रवाशांची करोना संबंधी वैद्यकीय तपासणी करण्यासाठी पोहोचली. गच्च भरलेल्या बसस्थानकावर पोलीस आणि म.रा.परिवहन यांचे कर्मचारी तसेच माजी सैनिक श्री.मलेवार यांनी आज लोकांना तपासण्याची पूर्वतयारी सिद्ध करून ठेवल्यामुळे ताबडतोब तपासणी चालू झाली. सोबत एन जी ओ च्या मॅडम नोंदणी करीत असल्यामुळे तपासणी लवकर लवकर होत होती. डाॅ कृष्णा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.सुशिल मेश्राम, डॉ के कमल बांभोटे, डॉ.शुभम निकम, डॉ निकेतन यांनी एकंदरीत ६०८ व्यक्तिंची शिस्तबद्ध पद्धतीने वैद्यकीय तपासणी करून त्यांना ताबडतोब वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यात आले….

Read More