आज २ ठिकाणी
BAHO व DBASNJS
कालच्या प्रमाणे आजही डॉ बाबासाहेब आंबेडकर हेल्थ ऑर्गनायझेशन (BAHO) व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त नागरी जयंती समितीची टीम भर उन्हात नागपूरातील सर्वात जास्त रहदारी असलेल्या पांझरी नाक्यावर दुपारी २.३० ला पोहोचली.
तर दुसरी टीम भाटिया फार्म कामठी रोड येथे पोहोचली
ट्रक भरून भरुन प्रवासी पांझरी टोल नाक्यावर उतरत होते परंतु आज वैद्यकीय प्रमाणपत्राच्या प्रती उपलब्ध नसल्यामुळे वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यास विलंब झाला.
प्रमाणपत्र येताच डॉ.कृष्णा कांबळे सरांच्या मार्गदर्शनाखाली आपापल्या गावी जाण्यासाठी जमलेल्या सर्व प्रवाशांची करोना संबंधी वैद्यकीय तपासणी डॉ.माया ब्राह्मणे , डॉ.प्रसाद माया ब्राह्मणे व डॉ. निकेतन यांनी द्रुतगतीने करून त्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र दिले.तर राज रक्षित व पियुष शामपात्रा,अभिलाष राऊत यांनी प्रवाशांच्या नोंदणीची धुरा समर्थपणे सांभाळली. आज जवळपास ५०६ व्यक्तिंची न थांबता वैद्यकीय तपासणी करून त्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यात आले.
तसेच भाटिया फार्म कामठी रोड येथे डॉ सुचित बागडे, डॉ.अभिषेक सोंडवले, डॉ पवन रामटेके व दिनेश खापर्डे यांनी जवळ पास ११० लोकांची तपासणी करून त्यांना प्रमाणपत्र दिले
वैद्यकीय तपासणी यशस्वीपणे पार पाडण्यामध्ये NCC २०MH बटालियनच्या अभिषेक धनविजय ,सागर कामोने, शशांक,कनिका ,मो.उसाना आणि अविनाश यांनी मोलाची मदत केली.त्यांनीं गच्च भरलेल्या टोलनाक्यावर प्रवाशांची नोंदणी करीत आणि फिजिकल डिस्टंसिंग ठेवित शिस्तबद्ध कार्य केलेे.
.
डॉ बाबासाहेब आंबेडकंर हेल्थ ऑर्गनायझेशन (BAHO)
आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर संयुक्त नागरी जयंती समिती