Medical check up for Covid 19 on 11/5/2020

दि. ११-०५-२०२० रोजी श्री.निलेश भरणे सरांनी सांगितल्याप्रमाणे डॉ बाबासाहेब आंबेडकर हेल्थ ऑर्गनायझेशन (BAHO) ची टीम दुसऱ्या दिवशीही गणेशपेठ बस स्थानकावर आपापल्या गावी जाण्यासाठी जमा झालेल्या ‌प्रवाशांची करोना संबंधी वैद्यकीय तपासणी करण्यासाठी पोहोचली. गच्च भरलेल्या बसस्थानकावर पोलीस आणि म.रा.परिवहन यांचे कर्मचारी तसेच माजी सैनिक श्री.मलेवार यांनी आज लोकांना तपासण्याची पूर्वतयारी सिद्ध करून ठेवल्यामुळे ताबडतोब तपासणी चालू झाली. सोबत एन जी ओ च्या मॅडम नोंदणी करीत असल्यामुळे तपासणी लवकर लवकर होत होती.

डाॅ कृष्णा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.सुशिल मेश्राम, डॉ के कमल बांभोटे, डॉ.शुभम निकम, डॉ
निकेतन यांनी एकंदरीत ६०८ व्यक्तिंची शिस्तबद्ध पद्धतीने वैद्यकीय तपासणी करून त्यांना ताबडतोब वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यात आले.

सायंकाळपर्यंत बस स्थानकावर हजर असलेल्या प्रत्येक व्यक्तीला वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यात आले.
स्थानकावर छोट्या बाळापासून ते वयस्कर व्यक्ती होत्या.प्रवासी वेगवेगळ्या राज्यात जाणारे होते परंतु सर्वात जास्त प्रवासी मध्यप्रदेश मधील होते.
तपासणी झालेल्या सर्व व्यक्तिंची पोलीस विभागातील श्री. अंकुश चौधरी यांनी व्यवस्थित यादी ठेवल्याबद्दल त्यांना धन्यवाद.

डॉ बाबासाहेब आंबेडकर हेल्थ ऑर्गनायझेशन (BAHO)