
श्री.निलेश भरणे सरांच्या आणि च्या आवाहनाला पुनःश्च प्रतिसाद देत डॉ बाबासाहेब आंबेडकर हेल्थ ऑर्गनायझेशन (BAHO) व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त नागरी जयंती समितीची टीम भर उन्हात नागपूरातील सर्वात जास्त रहदारी असलेल्या पांझरी नाक्यावर दुपारी २.३० ला पोहोचली.
ट्रक भरून भरुन प्रवासी पांझरी टोल नाक्यावर उतरत होते.इथे त्यांची वैद्यकीय तपासणी होत होती.
डॉ.कृष्णा कांबळे सरांच्या मार्गदर्शनाखाली व डॉ.राज गजभिये. प्रा.व विभाग प्रमुख सर्जरी विभाग यांच्या प्रोत्साहनाने सर्व डॉ. आपापल्या गावी जाण्यासाठी जमा झालेल्या प्रवाशांची करोना संबंधी वैद्यकीय तपासणी करण्यासाठी सज्ज झाले.
डॉ.माया ब्राह्मणे , डॉ.प्रसाद माया ब्राह्मणे व डॉ. निकेतन यांनी तत्परतेने प्रवाशांची तपासणी करून त्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यात आले.तर राज रक्षित व पियुष यांनी प्रवाशांच्या नोंदणीची धुरा समर्थपणे सांभाळली.सायंकाळी ६ वाजेपर्यंत एकंदर ४१४ व्यक्तिंची न थांबता वैद्यकीय तपासणी करून त्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यात आले.
वैद्यकीय तपासणी यशस्वीपणे पार पाडण्यामध्ये NCC २०MH बटालियनच्या अभिषेक धनविजय,अक्षय ठाकरे,सागर कामोने, मंगेश वालदे यांनी मोलाची मदत केली.त्यांनीं गच्च भरलेल्या टोलनाक्यावर प्रवाशांची नोंदणी करीत आणि फिजिकल डिस्टंसिंग ठेवित शिस्तबद्ध कार्य केलेे.
डॉ बाबासाहेब आंबेडकंर हेल्थ ऑर्गनायझेशन (BAHO)
आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर संयुक्त नागरी जयंती समिती


