८ वा दिवस. १९-०५-२०२०
आज पण डॉ बाबासाहेब आंबेडकर हेल्थ ऑर्गनायझेशन (BAHO) व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त नागरी जयंती समितीची टीम नागपूरातील सर्वात जास्त रहदारी असलेल्या पानझरी नाक्यावर भर दुपारी उन्हात पोहोचली.
आज ची पण टोल नाक्यावरील प्रवाशांची व्यवस्था चांगली होती.बॅरीकेड्स असल्यामुळे प्रवासी शिस्तबद्ध पद्धतीने रांगेमध्ये उभे राहून वैद्यकीय तपासणी करून घेत होते.
डॉ.कृष्णा कांबळे सरांच्या मार्गदर्शनाखाली आजचे टीम लीडर डॉ. देवनाथ खंडारे , सर्जरी विभाग यांनी आपापल्या गावी जाण्यासाठी जमलेल्या सर्व प्रवाशांची करोना संबंधी वैद्यकीय तपासणी करून त्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र दिले.
आज जवळपास ३०० लोकांची वैद्यकीय तपासणी यशस्वीपणे पार पाडण्यामध्ये निखिलेश बेले , अनिकेत माटे यांनी नाक्यावर प्रवाशांची नोंदणी करीत आणि फिजिकल डिस्टंसिंग ठेवित शिस्तबद्ध कार्य केलेे तसेच केळी व पाण्याच्या बाॅटल् स चे वितरण केले.
.
डॉ बाबासाहेब आंबेडकंर हेल्थ ऑर्गनायझेशन (BAHO)
आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर संयुक्त नागरी जयंती समिती
कंट्रोल रूम कृपया १८ व १९ दोन्ही तारखेची नोंद घ्यावी
१८ ता.- ८० प्रवासी
१९ ता. – ३०० प्रवासी