Medical check up for Covid-19 on 22/5/2020

दि. १०-०५-२०२० रोजी श्री.भरणै सरांच्या आवाहनाला तत्परतेने प्रतिसाद देत डॉ बाबासाहेब आंबेडकर हेल्थ ऑर्गनायझेशन (BAHO) ची टीम गणेशपेठ बस स्थानकावर आपापल्या गावी जाण्यासाठी जमा झालेल्या ‌प्रवाशांची करोना संबंधी वैद्यकीय तपासणी करण्यासाठी दु.३.३० वा. पोहोचली. गच्च भरलेल्या बसस्थानकावर पोलीस आणि म.रा.परिवहन यांच्या सहकार्याने तपासणीची जागा सिद्ध केली.

एकंदरीत २२२ व्यक्तिंची वैद्यकीय तपासणी करून त्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यात आले. डाॅ कृष्णा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. मुकेश वाघमारे, डॉ विजय मोहबिया, डॉ निकेतन यांनी अत्यंत तन्मयतेने जवळपास रात्री ९.३०पर्यंत तपासणी करून बस स्थानकावर हजर असलेल्या प्रत्येक व्यक्तीला वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यात आले.

स्थानकावर छोट्या बाळापासून ते वयस्कर व्यक्ती होत्या.प्रवासी छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेश, बिहार राज्यात जाणारे होते परंतु सर्वात जास्त प्रवासी छत्तीसगड मधील होते.तपासणी दरम्यान ८-९ वेळा लाईट्स पण गेले होते परंतु त्याच वेळेस पोलीस आणि म.रा.परिवहन मंडळातील कर्मचारी यांनी तत्परतेने मोबाईल चा प्रकाश देऊन वैद्यकीय तपासणीत व्यत्यय येऊ दिला नाही व जणू काही आपल्या मैत्री भावाचा व प्रवाश्यांबद्दलच्या माणुसकीचा प्रत्यय दिला.

श्री.भरणे सरांचे बस स्थानकाला व वैद्यकीय तपासणी स्थानाला भेट देणे व आवर्जून चौकशी करणे म्हणजे कर्तव्यपरायणता व माणुसकीचा अनोखा संगम होता.

वैद्यकीय तपासणी दरम्यान टेंपरेचर तपासणीचे यंत्रात (इन्फ्रारेड थर्मल टेंपरेचर गन) बिघाड झाल्याबरोबर ऊप्पल सर्जिकल कडून नवीन यंत्र खरेदी करून , प्रवाशांची तपासणी न थांबता पूर्णत्वास नेली.ऊप्पल सर्जिकल यांनी तत्परतेने बस स्थानकावर यंत्र आणून देऊन या सेवेत ते मागे नाहीत हे दाखवून दिले.त्याबद्दल धन्यवाद.

डॉ बाबासाहेब आंबेडकर हेल्थ ऑर्गनायझेशन (BAHO)