नेहमी प्रमाणे आजही डॉ बाबासाहेब आंबेडकर हेल्थ ऑर्गनायझेशन (BAHO) व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त नागरी जयंती समितीची टीम भर उन्हात नागपूरातील सर्वात जास्त रहदारी असलेल्या पांझरी नाक्यावर दुपारी २.३० ला पोहोचली.
पांझरी टोल नाक्यावर ट्रक थांबताच प्रवासी खाली उतरत होते.आज प्रवाशांची संख्या कमी होती.त्यांना स्नेहाने कार्यकर्ते व पोलीस कर्मचारी जेवणं करण्यास सांगत होते.
केंद्रावर सर्व व्यवस्था सुसंघटित होती.
डॉ.कृष्णा कांबळे सरांच्या मार्गदर्शनाखाली आपापल्या गावी जाण्यासाठी जमलेल्या सर्व प्रवाशांची करोना संबंधी वैद्यकीय तपासणी आज टीम लीडर डॉ.रोशन सिंहमारे यांनी केली.त्यांनी माणुसकी ला जिवंत ठेवित अत्यंत त्रासदायक परिस्थितीतून जाणाऱ्या प्रवाशांची तत्परतेने वैद्यकीय तपासणी करून त्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र दिले. तर अनिकेत माटे यांनी पानझरी टोलनाक्यावर प्रवाशांची नोंदणी करीत आणि फिजिकल डिस्टंसिंग ठेवित शिस्तबद्ध कार्य केलेे.
आज जवळपास ७० व्यक्तिंची योग्य वैद्यकीय तपासणी करून त्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यात आले.
सोबतच केळी व पाणी बाॅटल्सचे वितरण केले
-डॉ बाबासाहेब आंबेडकंर हेल्थ ऑर्गनायझेशन (BAHO)
आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर संयुक्त नागरी जयंती समिती
कंट्रोल रूम कृपया नोंद घ्यावी